।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सादर वंदन !
काल आपण "परेटोचा ८०/२० नियमाचा" सैद्धांतिक पक्ष बघितला. हा नियम आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या कसा उपयोगी पडतो यावर आज चिंतन करूया !

परेटोच्या या नियमाला समतोल साधण्याचा नियम देखील म्हणतात. कुठल्याही क्षेत्रातील असंतुलनाचे आकलन करण्यास हा नियम फार उपयोगी पडतो आणि या नियमाच्या आधारे विश्लेषण केल्यास हा आपल्या उत्पादकतेत, वेळ-व्यवस्थापनांत, स्वभावात, विक्रीत सर्व क्षेत्रात आपण पराकोटीचा बदल घडवू शकतो. कसे ते आपण उदाहरणाच्या माध्यमाने आपण पाहूया.
खालील चार्टमध्ये एका कंपनीने २० ग्राहक निवडून त्यांच्याकडून वर्षभरांत मिळालेला एकूण व्यवसाय
(रु.१,८१,००,०००/-) दर्शविलेला आहे. ग्राहक क्रमांक १ ते २० पर्यंत प्रत्येकाकडून वर्षभरांत मिळालेला एकूण व्यवसाय क्रमवार दर्शविलेला आहे -

यालाच ग्राहक संख्येच्या क्रमात न दर्शविता, मिळालेल्या व्यवसायाच्या आधारावर अधिक ते न्यून या क्रमांत खालील चार्टमध्ये दर्शविले आहे -
वरील दोन्ही चार्ट वरून असे कळून येते की आपल्याला मिळणाऱ्या एकूण व्यवसायाचा ८०% भाग आपल्याला पहिल्या ५ ग्राहकांकडून म्हणजे २०% ग्राहकांकडून मिळालेला आहे.
चार्ट क्रमांक २ वरून कळते की आपण आपल्या सर्व ग्राहकांपैकी २०% ग्राहक जे आपल्याला अधिक व्यवसाय देतात , त्यांच्यावर आपण आपले लक्ष अधिक केंद्रित केले पाहिजे. त्या ग्राहकांना विशेष सवलत, विशेष सेवा दिली पाहिजे. त्यांच्याशी आपले संबंध अधिक वाढविण्यात लक्ष दिले पाहिजे , त्यांच्या तक्रारी प्राथामिकतेने दूर केल्या पाहिजे जेणेकरून ते आपल्याला आणखी अधिक व्यवसाय देतील.

असेच आपण आपल्या दिवसातील कामांचे देखील विश्लेषण करू शकतो. आपण जर एका दिवसांत १० कामे केली असतील तर आपल्याला विश्लेषणाच्या आधारवर कळून येईल की दिवस भरांत मिळालेल्या परिणामांचा ८०% भाग आपल्याला केवळ २ किंवा ३ महत्वाची कामे केल्यामुळे मिळालेला असेल.
८०/२० हा केवळ एक प्रतीकात्मक आकडा आहे जो केवळ मोठा भाग आणि लहानसा भाग हा अनुपात दर्शविण्यासाठी प्रयुक्त झालेला आहे. हा अनुपात ९०/१० , ७०/३० , ९५/५ , ६५/३५, ६०/४० कुठलाही असू शकतो. या नियमामुळे आपल्याला आपल्या कामाच्या, वेळाच्या, विक्रीच्या, स्वभावाच्या, मिळकतीच्या विश्लेषण करण्याची दिशा आणि दृष्टी मिळते.

या विश्लेषणामुळे आपल्याला कळते की आपल्यासाठी महत्वाचे काय आहे.
आपली कार्य-योजना आखण्यास परेटोचा ८०/२० नियम फार उपयोगी पडतो. कसे ते पुढील लेखात पाहूया.