ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -१
'ध्येय' किंवा 'लक्ष्य' किंवा आंग्ल भाषेतील 'Goal' हे तीन ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत व त्यांचा सामान्य अर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण यांच्या आपल्याला माहीत असलेल्या सामान्य अर्थापेक्षा या शब्दांना 'संकल्पना' या रूपांत पहायचे असले, समजून घ्यायचे असले तर आपल्याला खूप खोलांत शिरून पहावे लागते.
'ध्येय' या संकल्पनेची अगदी सोप्या भाषेत व्याख्या करावयाची असल्यास - "एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि ठराविक समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन म्हणजे 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' असते."
वरील व्याख्ये वरुन असे ध्यानांत येते की 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या संकल्पनेसाठी खालील ७ अटी आवश्यक आहे-
१.कुणी - एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने
२.कसे - दूरदृष्टी ने
३.कोणत्या पद्धतीने - सुनियोजितपणे / सुनियोजित पद्धती ने
४.कधी - ठराविक समय सीमेत
५.कशासाठी - अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी,
यशाचे शिखर गाठण्यासाठी
६.काय - चिंतन करणे, योजना आखणी, रणनीती ठरवणे,मार्गात
येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी विचार करणे
७.वैशिष्ट्य - क्रियेसाठी किंवा कृतीसाठी प्रेरक ठरणारे चिंतन
यात 'अपेक्षित परिणाम मिळविणे' अर्थात 'यशाचे शिखर गाठणे' हा एकमात्र अर्थ आपण 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या शब्दाचा घेतो पण 'यशाचे शिखर गाठण्यासाठी' वर उल्लेख केलेल्या अन्य ६ अटी पूर्ण करण्यासाठी कष्ट/ परिश्रम घेत नाही, म्हणून 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' मिळविणे कठीण किंवा अशक्य वाटू लागते व आपण ध्येयाची वाट सोडून देतो, परिणामी आपण ठरविलेले 'ध्येय' एक 'अपूर्ण इच्छा' बनून राहून जाते. पण आपण जर ध्येय ठरवितांना आणि ध्येयाच्या वाटेवर चालतांना वरील सात ही अटींचा विचार केल्यास 'ध्येय' गाठणे शक्य होते.
पुढील भागापासून या अटींवर अधिक चिंतनाला प्रारंभ करूया.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
पुढील भागापासून या अटींवर अधिक चिंतनाला प्रारंभ करूया.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
This comment has been removed by the author.
ReplyDeleteउत्तम लेख, खूप काही शिकायला मिळेल आमच्या पीढ़ीला , तुमच्या ह्या लेखन श्रृंखलेतून काका.. धन्यवाद 🙏
ReplyDelete