।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सादर वंदन !
मागील अंकात आपण बघितले की परेटोचा ८०/२० चा नियम आपली कार्ययोजना आखण्यास कसा उपयोगी पडतो. आज आपण आपल्या वेळेचा परिणामकारकपणे इष्टतम उपयोग (Optimum Utilization) कसा करावा यावर चिंतन करूया. वेळाच्या इष्टतम उपयोगासाठी आपल्याला खालील साधनांचा उपयोग करायची सवय स्वत:ला लाऊन घ्यायला हवी -
०१) आपली दैनन्दिन कृति-योजना आखणी (Daily Action Planning) : आपल्याला रोज सकाळी प्रातर्विधी आटपल्यावर सर्वप्रथम १५ मिनिटे आपली दिवसभराची कृति-योजना आखणी करण्यास द्यायला हवी. त्यापूर्वी एक दिवस आधी आपल्याला आपल्या सर्व प्रलंबित कामे (Pending Works), भविष्यात करावयाची कामे, सामाजिक कामे, पारिवारिक उत्तरदायित्वाची कामे सर्वांची एक यादी बनवायला हवी आणि त्यांची विभागणी दोन प्रकारे करावी- ०१) १७ ऑगस्टच्या चिंतनांत विचार केल्याप्रमाणे यादीतील आपल्या सर्व कामांची वैज्ञानिक दृष्टीकोणातून विभागणी करावी आणि ०२) यादीतील सर्व कामांच्या पुढे - अ) आठवड्यात करायची कामे, आ) महिन्याभरात करायची कामे आणि इ) वर्षभरात करायची कामे, आणि ई) वर्षभरानंतर करायची कामे अ/आ/इ/ई अशी मार्किंग / लेबलिंग करून त्यांचा प्राधान्यक्रम (Priority) ठरवावा. अश्याने दररोज सकाळी आपली दैनंदिन कृति-योजना आखणी करतांना आपली आजची व आठवड्या भरांत करायची सर्व कामे आपल्या समोर स्पष्ट लिहलेली असल्याने आपल्याला आपली कृति-योजना आखणी करणे फार सोपे जाते व त्यांत आनंद देखील वाटू लागतो. आपली कृति-योजना ठरविण्यासाठी खालील तालिका फार उपयोगी ठरतात.
०२ ) आपल्या कामाला ठरविलेल्या वेळेत पूर्ण करणे : आपली दैनंदिन कृति-योजना ठरविताना प्रत्येक कामासाठी अनुमानित अवधी त्या कामासमोर लिहावी जेणेकरून त्या कामांना वेळेवारी पूर्ण करणे शक्य होईल. प्रत्येक काम वेळेवारी पूर्ण करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे ते आपण पुढील अंकात पाहूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
No comments:
Post a Comment