।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
काल आपण बघितले की आपल्या वेळ-व्यवस्थापनामध्ये सर्वात मोठी अडचण आपली अपूर्ण कामे असतात. या अपूर्ण कामांचा ढीग आपल्या समोर तयार झाला की आपल्याला काही सुचत नाही आणि या ढीगात आणखी कामांची भर रोज पडत असल्यामुळे हा ढीग आणखी मोठा होत जातो. अपूर्ण कामांच्या वाढत्या दबावामुळे आपल्याला फार मानसिक त्रास होतो. या त्रासामुळे आपली कामे आणखी बिघडत जातात, परिणामस्वरूप आपला आत्म-विश्वास कमी होत जातो. जी कामे आधी आपण अगदी सहजपणे करीत होतो, ती कामे पूर्ण करणे तर दूर त्या कामांच्या विचारांमुळे आपल्याला घाम सुटू लागतो. याचे मुख्य कारण आपला आत्मविश्वास कमी होणे आहे. केवळ सर्व अपूर्ण कामांची एक यादी बनवून या परिस्थितीला मात देणे संभव आहे. सर्व कामांची यादी तयार झाल्यामुळे आपण आपल्या स्मरण-शक्तीवर अवलंबून रहात नाही. लेखी स्वरुपात आपल्या समोर कामांची यादी असल्यामुळे आपल्याला कामे आठवावी लागत नाही आणि ती वेळीच पूर्ण करता येतात.
आपली अपूर्ण कामांची यादी फार मोठी झाल्यास काळजी करू नये. अगदी सोपी वाटणारी, पूर्ण होण्यास अगदी कमी वेळ घेणारी कामें करावयास सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक काम सम्पन्न झाल्यावर स्वत:ला शाबासकी देणे विसरु नये कारण अश्याने आपला आत्मविश्वास वाढत जातो,
सर्व कामांची यादी तयार झाल्यावर त्या कामांची कार्यालयीन, पारिवारिक आणि धार्मिक,अध्यात्मिक किवा सामाजिक या तीन विभागांमध्ये विभागणी करावी. याच प्रमाणे आपल्या दिवसभरातील किंवा आठवड्यातील एकूण वेळाची पण काल पाहिलेल्या ६ भागात विभागणी करावी. कामांची आणि वेळाची योग्य विभागणी झाल्यावर प्रत्येक कामाला पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळाची गणना करून दिवसातून कुठल्या वेळात ते काम करायचे आहे, आठवड्याच्या कुठल्या दिवशी ते काम करायचे आहे हे ठरवावे.
वरील विभागणी करतांना आपल्याला बरीच कामे अगदी फालतू आणि वेळ-खाणारी वाटतील, अश्या कामांना आपल्या यादीतून खोडून द्यावे नाहीतर अन्य दिवशी फावल्या वेळात ते काम पूर्ण करावे.
'विभागणी' आणि 'कार्य-वाटप' करण्याची सवय अंगी बाणल्याने यश-सम्पादनाची गति आश्चर्यजनकरीत्या वाढते. कार्य-वाटप करतांना हे नेहमी ध्यानांत ठेवावे की ज्या व्यक्तीवर आपण कामाची जवाबदारी सोपवितो आहोत त्या व्यक्तीवर पूर्ण-पणे विश्वास ठेवायला हवा. एकदा कुणाला काम दिले की त्या कामाच्या मधे-मधे लुड-बुड कधीच करू नये. आपल्याला त्या व्यक्तीला जर कामा सम्बन्धी काही निर्देश द्यायचे असेल तर ते त्याला आधी समजावून सांगितले पाहिजे. त्याने एकदा काम सुरु केले की मग आपण त्याच्याहून अलिप्त राहून त्याला गरज पडेल तेव्हां त्याच्या मदतीसाठी तयार रहावे. त्या व्यक्तीवर आपली कार्य-पद्धति लादण्याचा आग्रह चुकुनही धरु नये. प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते, व त्याला स्वत:च्या सुविधेनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य असेल पाहिजे. त्याच्या कार्य-पद्धतीचा सन्मान करावा आणि त्याला हवी ती मदत करण्यास आपण तयार असावे. मधे-मधे लुड-बुड केल्याने आपला वेळ वाया जातो आणि समोरच्या व्यक्तीची काम करण्याची रुची कमी होत जाते.
कार्य-वाटप केल्यामुळे आपला वेळ देखील वाचतो. या वाचलेल्या वेळाचा आपण आपल्या कुऱ्हाडाला धार लाविण्यात अर्थात स्वत:च्या ज्ञानात भर घालण्यास उपयोग करावा. कार्य-वाटपाने आपले महत्व कमी होईल असे भय जरी आपल्याला वाटत असले तरी तसे प्रत्यक्षात घडत नाही उलट आपल्याला आपल्या क्षमतेहून अधिक मोठी कामे करण्याची योजना आखणे आणि त्या योजनेला मूर्त रूप देणे शक्य होते.

No comments:
Post a Comment