।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
कामाची विभागणी वैज्ञानिक दृष्टीकोणातून 'महत्वाची' आणि 'तातडीची' अश्या दोन प्रकारांच्या आधारावर चार विभागांमधे कशी करावी यावर आपण काल विचार केला. आज आपण आपल्या कामांच्या यादीतील याच चार विभागांच्या कामांचे प्रमाण यावर चिंतन करूया.
वरील चित्रामध्ये चार चौकोनात चार प्रकारच्या कामांची विभागणी करावी.
चौकोन १ मधील कामे महत्वपूर्ण आणि तातडीची दोन्हीं आहेत. त्वरित लक्ष घालून करायला हवी अशी ही कामे असतात व त्वरित केली तर महत्वाचे परिणामही मिळतात. या चौकोनातील कामांना आपण 'आणी-बाणीची' किंवा 'अडचण/समस्या/आपत्ती' असे म्हणतो. आपल्या दैनिक जीवनांत अशी बरीच कामे आपल्याला करावी लागतात, समस्या/अडचणींशी झुंजावे लागते. आपण जर या अडचणीवर किंवा समस्यांवर मात केली तर आपण केवळ 'आणी-बाणी व्यवस्थापन' , 'आपत्ती व्यवस्थापन' करीत केवळ 'अंतिम मुदतीचे अनुसरण करणारे' (Meeting Deadlines) म्हणवू . आपण चौकोन १ मधील कामांमध्ये अधिक रस घेतला तर आपण त्यातच बुडून जाऊ. एका मागे एक समस्या, अडचणी, तातडीचे कामे येतच राहतील आणि त्यांना पूर्ण करण्यातच आपण आपला मौल्यवान वेळ गमावून देऊ आणि आपल्याला क्षणभर विसावा मिळावा, मनोरंजन व्हावे म्हणून आपण आपले लक्ष चौकोन ४ मधील कामांकडे वळवू जी महत्वाची पण नाहीत आणि तातडीची पण नाहीत.
अश्याप्रकारे आपला अधिकतम वेळ चौकोन १ मधील कामात व्यतीत झाल्याने आपला मानसिक तणाव वाढतो, तब्यत खालवते, सदैव एक टाईम- बॉम्ब आपल्या हातात असतो व तो कधी ही फुटू शकतो म्हणून आपण त्याला घेऊन वेळ-साधण्यास यंत्रवत पळत असतो.
आपण बऱ्याचदा आपला वेळ चौकोन ३ मधील "तातडीची पण बिना महत्वाची' कामे करण्यात आपला वेळ घालवतो. कारण तातडीची कामे करतांना आपण मुळीच विचार नाही करत की खरच हे काम करणे गरजेचे आहे कां? आपल्यासाठी हे काम महत्वपूर्ण आहे कां? आपण हे काम कुणा दुसऱ्या व्यक्तीवर नाही सोपवू शकत कां? आपण केवळ ती कामे तातडीची आहेत म्हणून विना विचार करता करू लागतो. अश्यामुळे आपला अधिकतम वेळ विना-महत्वाच्या कामांमध्ये वाया जातो आणि आपल्या मनांत नकारात्मक भाव उत्पन्न होऊ लागतात, आपल्या मनांत 'लक्ष्य ठरविणे' ही संकल्पना उदयाला येतच नाही, 'नियोजन' आणि 'परिणाम' या दोन्हींकडे आपले दुर्लक्ष होते कारण त्याची किमत समजून घ्यायला आपल्याकडे वेळच नसतो. चौकोन ३ मधील कामे करून-करून थकल्यावर आपण चौकोन ४ चा आश्रय घेतो आणि विना तातडीची आणि विना महत्वाची कामे अगदी 'उगाच' करू लागतो. याचे फार गंभीर आणि घातक परिणाम समोर येतात. चौकोन ३ आणि ४ मधील कामे करतांना आपले चौकोन १ मधील कामांकडे दुर्लक्ष होते किंवा आपण जाणतेपणाने चौकोन १ मधील कामांकडे दुर्लक्ष करतो. परिणाम-स्वरूप 'एक बेजवाबदार व्यक्ती' च्या रूपांत आपली छवी कार्यक्षेत्रात किंवा समाजात बनते. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या याच कारणामुळे सुटतात कारण ते नेहमी व्यस्त असतात आणि आपल्या मुलभूत गरजांसाठी, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहतात, नेहमी मदतीची अपेक्षा करीत असतात. पण 'विना महत्वाच्या' कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या व्यस्ततेचा फायदा त्यांच्या कंपनीला होत नसतो.
स्टीफन कवे यांच्या मते यशस्वी व्यक्ती चौकोन ३ आणि ४ यांच्या मधील कामांकडे मुळीच लक्ष देत नाहीत कारण तातडीच्या असो वा नसो ती कामे महत्वाची नसतात. याशिवाय यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामांवर अधिक लक्ष आणि वेळ देऊन चौकोन १ च्या कामांच्या यादीचा आकार पण अगदी लहान करतात.
स्टीफन कवे यांच्या मते चौकोन २ मधील कामांसाठी अधिक वेळ देणे 'यशस्वी वैयक्तिक व्यवस्थापनासाठी' फार गरजेचे आहे. तातडीच्या नसलेल्या पण महत्वाच्या गोष्टीं चौकोन २ मध्ये जितक्या अधिक असतील तितक्या लांब पल्ल्याचे यश आपण मिळवू शकतो कारण यात नाते-संबंध केवळ टिकविणेच नव्हे तर वाढविण्याचा विचार केलेला असतो, नियमित व्यायामाद्वारे आरोग्याचा विचार केलेला असतो जेणेकरून महत्वाच्या कामाच्या दिवशी आपल्या प्रकृती-संबंधित अडचण येत नसते, वैयक्तिक प्राथमिकतेचे निर्धारण केलेले असते, आपले ध्येय-वाक्य ठरवून आपली दिशा निर्धारित केलेली असते, बिघाडापुर्वीच दुरुस्तीचा विचार केलेला असतो, आपल्या कामांचा दूर-दृष्टीने विचार केलेला असतो त्यामुळे मार्गातील संभावित अडचणी /समस्यांवर विचार केलेला असतो.
विस्तार भयामुळे आज येथेच विरमतो आहे ! उद्या चौकोन २ मधील कामांवर आणखी विस्तृत चिंतन करूया.

No comments:
Post a Comment