।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
आपण वेळ व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत काल बघितले की वेळेची किंमत कशी काढावी. आपण बघितले की वेळेची किंमत कळल्यावर पुढील योजना आखण्यास आपण प्रवृत्त होतो. योजना आखताना महान आणि यशस्वी विभूतींची चरित्रे वाचल्याने किंवा ऐकल्याने आपला आत्मविश्वास बळावतो आणि हळू-हळू आपले मन सकारात्मक विचारसरणी आत्मसात करून आपल्या मार्गात यशाच्या दिशेकडे अग्रसर होतो.
सकारात्मक विचारसरणी अंगीकार करून केवळ विचार करीत बसल्याने यश-संपादन होत नसते. आपल्या विचारांना आचरणांत आणल्याखेरीज, योजनेचे क्रियान्वयन केल्याखेरीज यश-संपादन होत नसते.आपण आखलेल्या योजनेचे क्रियान्वयन करतांना, मार्गात जर अनपेक्षित अडथळे निर्माण झाले, आपल्या अपेक्षेप्रमाणे परिणाम नाही मिळाले, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तर या सर्व अडथळ्यांवर मात करत पुढचा मार्ग काढण्यासाठी सकारात्मक विचारसरणी उपयोगी पडते. उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी आपल्याला आपली दिनचर्या ठरविणे फार गरजेचे आहे पण आपली दिनचर्या ठरविणे म्हणजे केवळ कागदावर "आदर्श टाईम-टेबल" बनविणे आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करणे नव्हे. ज्याप्रमाणे शेतकरी पेरणी करण्यापूर्वी शेतातील 'खरपतवार' उपटून जमिनीची 'मशागत' करतात, त्याच प्रमाणे आपल्याला आपल्या मनातील अवांछित नकारात्मक आणि आळसात्मक विचार उपटून मनाची 'मशागत' करून मगच त्यात 'आदर्श दिनचर्या' ठरविण्यासाठी विचारांची पेरणी करावी.
मनाची मशागत कशी करावी तर दिनचर्या ठरविण्यापूर्वी आपल्याला आपल्या वर्तमान दिनचर्येचे विश्लेषण करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला एक आठवडा आपली 'अस्सल' दिनचर्येची एक 'लॉग-बुक' तयार करायला हवी आणि त्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला वेळ कसा आणि कुठल्या कामांमध्ये व्यतीत झाला हे तारीखवार आणि तास भराच्या अंतराळात नोट करीत राहावे.
आठवडा झाल्यावर लिहिलेल्या प्रत्येक तासाच्या कामाची विभागणी 'A' , 'B', 'C' आणि 'D' या विभागांमध्ये करावी. आवश्यक आणि महत्वपूर्ण अश्या कामांची 'A' , आवश्यक नाही परंतु महत्वपूर्ण अश्या कामांची 'B' आणि महत्वपूर्ण नाहीत पण आवश्यक अश्या कामांची 'C' आणि आवश्यक पण नाही आणि महत्वपूर्ण पण नाही अश्या कामांची 'D' विभागात स्वतंत्र विभागणी करून लिहावे.
'आवश्यक', 'महत्वपूर्ण' आणि 'अनावश्यक' या तीनही परिभाषा व्यक्तीसापेक्ष असतात अर्थात प्रत्येक व्यक्तीची या तीनही शब्दांची परिभाषा वेग-वेगळी असते. एकाला कुठले कार्य महत्वपूर्ण वाटते तर दुसऱ्याला ते अनावश्यक. येथे चारी प्रकारचे उदाहरण एका विद्यार्थ्याच्या दृष्टीने देणे मला गरजेचे वाटते जेणेकरून विषयाला समजणे सोपे जाईल.
महत्वपूर्ण आणि आवश्यक : विद्यार्थ्याच्या दृष्टीने परीक्षा डोक्यावर आल्यावर अभ्यासाचा वेळ वाढवणे, रात्री उशिरा पर्यंत जागून अभ्यास करणे हे महत्वपूर्ण आणि आवश्यक दोन्ही आहे.
महत्वपूर्ण पण आवश्यक नाही : विद्यार्थ्याच्या दृष्टीने वर्षभर नियमित रूपाने अभ्यास करणे, आपल्या आहारा -संबंधी काळजी घेणे, नियमित रूपाने काही वेळ योग/व्यायाम करणे, आपली एकाग्रता निर्माण करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी 'ध्यान' करणे हे आवश्यक नाही पण महत्वपूर्ण आहे.
महत्वपूर्ण नाही पण आवश्यक : विद्यार्थ्याच्या दृष्टीने घराच्या मंडळीने अंतिम तिथी आल्यावर सांगितलेले विजेचे, टेलीफोनचे बिल तातडीने अन्य महत्वाची कामे सोडून भरणे हे महत्वपूर्ण नाही पण आवश्यक आहे.
महत्वपूर्ण नाही आणि आवश्यक पण नाही : विद्यार्थ्याच्या दृष्टीने शाळा, कॉलेज, ट्युशन, कोचिंग, जिम सुटल्यावर मित्र - मैत्रिणींबरोबर उगाच वायफळ गप्पा मारत आपला मौल्यवान वेळ फुकट घालविणे हे महत्वाचे पण नाही आणि आवश्यक तर मुळीच नाही.
अश्याप्रकारे आपल्याला दिवसभरांत केलेल्या प्रत्येक कामाची विभागणी वरील चार भागात करून घ्यायला हवी. कुठले काम महत्वाचे आणि कुठले काम महत्वाचे नाही हे देखील ठरविणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही यासाठी आपल्याला प्रत्येक कामाची विभागणी करण्याआधी त्या कामाने आपल्याला काय साध्य झाले? आपण काय मिळविले? आपल्याला काय फायदा झाला? या कामाचा काय परिणाम होईल? शांत बसून असे प्रश्न स्वत:ला
विचारून , मग जे उत्तर मिळेल त्या प्रमाणे त्याची विभागणी करावी.
एक आठवड्याच्या या नोंदणीमुळे आपल्या समोर तथ्यावर आधारीत 'अस्सल' सामग्री विश्लेषणासाठी उपलब्ध असल्या कारणाने आपल्याला आपली 'रुची', आपला 'कल' , 'आपले ध्येय' आणि आपली 'गरज' या सर्व बाजूनी विचार करून आपल्यासाठी 'योग्य दिनचर्या' ठरविता येईल. 'आदर्श दिनचर्या' अंगीकार करणे सोपे नाही पण 'योग्य दिनचर्या' अंगीकार करणे फार सोपे आहे कारण त्यात आपली ;रुची' , आपला 'नसर्गिक कल', आपली क्षमता' 'आपले गुण', 'आपले दोष' आणि 'आपल्या साठी योग्य मार्ग' या सर्व गोष्टींचा विचार आपण केलेला असतो आणि तिला अंगीकार केल्याने आपल्या वेळेचे उत्तम व्यास्थापन करणे संभव होते जेणेकरून आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त आणी मोकळा होत जातो.
म्हणून आदर्श दिनचर्येपेक्षा 'योग्य दिनचर्या' ठरविणे आणे त्यानुसार चालणे आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे.

No comments:
Post a Comment