।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
काल आपण बघितले की आपल्या वेळ-व्यवस्थापनाच्या मार्गात सर्वात मोठी अडचण आहे आपली "चालढकल करण्याची", "दिरंगाई करण्याची" वाईट सवय ज्याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत "Procrastination" म्हणतात.
या सवयीसाठी कारणीभूत असतो आपल्या डोक्यात सतत उड्या मारत राहणारा एक माकड ज्याला आपण "झटपट आनंद देणारा माकड" असे म्हंटले आहे कारण तो आपल्याला कुठलेही काम एकतर सुरूच नाही करू देत आणि सुरु जरी करू दिले तरी ते पूर्ण न करता आपल्याला मेंदूला अन्य बरीच कामे, विचार सुचवतो आणि हातातले काम अर्धवट सोडून लगेच दुसरे काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, दुसरे काम ही पूर्ण नाही करू देत लगेच तिसऱ्या कामाकडे वळवतो. असा स्वच्छंदपणे "त्रैलोकी" भ्रमण करणारा हा माकड आपल्याला कुठलेही काम पूर्ण करू नाही देत आणि तार्किक कारणे देऊन आपल्याला सतत हे पटवत राहतो की आपण जे करीत आहे तेच योग्य आहे. थोडक्यात म्हंटले तर हा माकड आपल्या 'मेंदूच्या स्टेयरिंगचा ताबा घेतो' आणि आपल्याला 'यशाच्या विरुद्ध दिशेला' घेऊन जातो आणि आपण देखील स्वखुशीने याच्या स्वाधीन होऊन यशाच्या विरुध्द दिशेने वाटचाल सुरु करतो.
आपण स्वत: जर या "माकडाच्या हातात कोलीत" दिली तर आपल्या यशाची नौका तरण्या ऐवजी बुडेल हे निर्विवाद आहे.
आपल्याला चालढकल किंवा दिरंगाई ची सवय मोडण्यासाठी प्रयत्न करण्याआधी या सवयी मागची कारणे शोधायला हवी. कारणे शोधल्याखेरीज कितीही प्रयत्न केले तरी ही सवय मोडता येणार नाही, म्हणून आपण आधी या सवयी मागची कारणे बघूया.
दिरंगाई किंवा चालढकल या मागचे सर्वात मोठे कारण आहे आपली "अनियमित दिनचर्या". आपली दिनचर्या आपण नियमित करण्याचा फार प्रयत्न करतो पण ते करणे आपल्याला जमत नाही. कां जमत नाही ? कारण आपण आपली दिनचर्या ठरवताना ती 'आदर्श' असावी यावर जोर देतो पण आपली दिनचर्या ही आदर्श असण्यापेक्षा आपल्यासाठी 'योग्य' असावी यावर आपण ११ ऑगस्ट २०१६ रोजी "आपली दिनचर्या 'आदर्श' असावी की 'योग्य' असावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-५" या विषयावरील लेखात पाहिले आहेच. म्हणून सर्वप्रथम आपल्याला अनुसरण (Follow) करण्यास 'अनुकूल' अशी आपल्यासाठी "योग्य" दिनचर्येची आखणी करून तिचे अनुसरण प्रारंभ केले पाहिजे. दिनचर्या आखून ती एका मोठ्या बोर्डावर लिहावी आणि येत-जाता आपली सतत नजर पडेल अश्या जागेवर तो बोर्ड लावावा. नजर पडल्यावर त्या बोर्डाकडे दुर्लक्ष न करता थोडे थांबून लक्ष देऊन वाचायला हवी आणि आपण त्या दिनचर्ये प्रमाणे काय केले त्यासाठी आधी स्वत:ला 'शाबासकी' द्यावी आणि जे सुटले ते उद्यापासून सुटणार नाही असा दृढ संकल्प करावा. असे येत-जाता सारखे केल्याने ती दिनचर्या आपल्या मनावर 'खोलवर' रुजते. हे करतांना आपल्या डोक्यातील माकड 'सुटले तर सुटले, एकदम सारे काही जमणार नाही' असा विचार मनांत आणून आपल्याला परावृत्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल म्हणूनच आधी जे जमले त्यासाठी स्वत:ला "शाबासकी" देणे आणि नंतर जे सुटले त्यासाठी "उद्या पासून हे मुळीच सुटणार नाही" असे "सकारात्मक खाद्य" त्या माकडाला पुरविणे फार गरजेचे आहे. अश्याने त्या दिनचर्येचे पूर्णपणे अनुसरण करण्याचा आपला निश्चय ठाम होत जाईल आणि हळू-हळू आपल्या जीवनात 'नियमितता' येईल.
दिरंगाई किंवा चालढकल करण्यामागचे दुसरे मोठे कारण आहे "आपला अव्यवस्थितपणा" . आपण आपले प्रत्येक काम व्यवस्थितपणे केल्याने आपला बराच वेळ वाचतो. व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपल्याला स्वत:वर बरेच काम करावे लागते. आपली 'आवड' आणि आपली 'गरज' या दोन्हीला नीट समजून त्याप्रमाणे आपल्या कुठल्या कामांना 'प्राथमिकता' द्यायला हवी आणि कुठल्या कामांना दुय्यम दर्जा द्यायला हवा हे ठरवायला हवे. उदाहरणार्थ 'अंतर्जालावर' भ्रमण (Internet-surfing) करणे आणि त्याद्वारे आपले मनोरंजन, ज्ञानार्जन करणे आपल्याला फार आवडते पण आपण जर आवश्यक कामे सोडून हे करीत बसलो तर आपला मौल्यवान वेळातील एक मोठा भाग वाया जाईल, आपली कामे पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला भरपूर मानसिक त्रास होईल, कार्यालयातील आपल्या 'छवी' वर प्रतिकूल प्रभाव पडेल, मग अश्या मनोरंजनाचा आणि ज्ञानार्जनाचा आपल्याला काय फायदा झाला ? मनोरंजना ऐवजी आपल्याला मनस्ताप झाला, ज्ञानार्जन झाले पण ते आपल्या उपयोगी नाही आले आणि सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपला मौल्यवान वेळ फुकट गेला. हातातून निसटलेला 'पैसा' परत येऊ शकतो पण निसटलेला एक 'क्षण' देखील कितीही किंमत मोजली तरी परत हातात येत नाही. आपल्या या अव्यवस्थितपणासाठी पण जवाबदार आपल्या डोक्यातील तोच "झटपट आनंद देणारा माकड"च आहे. आपण काही पण व्यवस्थित करायला गेलो की तो आपले लक्ष्य दुसऱ्या कामाकडे वेधतो आणि आपण देखील हातातले काम, पसारा तसेच टाकून त्या दिशेने जाऊ लागतो. परिणाम स्वरूप आपले घर, आपले कार्यस्थळ सर्व अव्यवस्थित आणि पसरलेले दिसते.
व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपल्याला या माकडाकडे दुर्लक्ष करणे सुरु करायला हवे. सर्व कामांची एक यादी बनवायला सुरुवात करायला हवी, आपल्या 'स्मरण-शक्ती' वर अवलंबून न राहता या यादीत लहान-मोठे प्रत्येक कामाची नोंद करायला हवी. कामांचे महत्व आणि तातडी (Urgency) ध्यानांत ठेऊन यादीतील प्रत्येक कामाला वरीयता क्रम (Priority Number) द्यायला हवा. वरीयता सूचीतील प्रथम क्रमांकाचे काम प्रथम असे क्रमवार एक-एक करून कामे पूर्ण करायला हवी. लहान-मोठे कुठलेही कार्य पूर्ण झाले की स्वत:ला शाबासकी देणे विसरू नये. राहिलेल्या कामांसाठी 'आज नाही झाले काही हरकत नाही उद्या नक्की पूर्ण करीन', 'अवघड आहे पण अशक्य नाही' मनाला अश्या सकारात्मक सूचना देऊन स्वत:ला राहिलेल्या कामांसाठी प्रवृत्त करावे. सर्वात मोठे आणि महत्वाचे म्हणजे या माकडाच्या विलक्षण शक्तीचा उपयोग ही कामे कशी करता येतील यावर विचार करण्यात करावा. या माकडाची कल्पना-शक्ती फार विलक्षण आहे तो कामे करण्याचे सोपे मार्ग, नवीन कल्पना नक्की सुचवेल.

No comments:
Post a Comment