सुप्रभातम् !
आपण वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत आहोत !
काल आपण पाहिले की परमेश्वराने एक फार मौल्यवान वस्तू आम्हां सर्वाना विना भेदभाव करता सम-प्रमाणात दिली आहे ती म्हणजे 'वेळ' आणि या मौल्यवान वस्तूची किंमत आपण करणे फार गरजेचे आहे कारण आपल्याला मिळालेल्या वेळातून एक क्षण जर आपल्या हातून निसटला, वाया गेला तर काही केल्या , आयुष्य भर साठवलेला पैसा, संपत्तीची किंमत मोजून देखील गेलेला क्षण परत मिळवता येत नाही. मग अश्या वेळेची किंमत करायला नको कां ? वेळेला वाया घालविण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन आणि अचूक गुंतवणूक केली तर 'यश' आपल्या पदरी नक्की पडेल.
यशाची संकल्पना प्रत्येक व्यक्तीची वेग-वेगळी असते ! कुणासाठी पैसा, संपत्ती , ऐश्वर्य, वैभव मिळविणे म्हणजे 'यश' आहे तर कुणासाठी प्रसिद्धी, मान-सन्मान मिळविणे म्हणजे 'यश' आहे कुणासाठी 'आध्यात्मिक' उत्कर्ष साधणे म्हणजे 'यश' आहे.

पण यशाच्या या तीनही संकल्पना अचूक 'वेळ-व्यवस्थापन' केल्याने साकार होतात.
वेळ-व्यवस्थापना विषयी देखील आपली फार चुकीची समजूत आहे. आपण समजतो की दिवसभर 'व्यस्त' राहणे, कठीण परिश्रम करणे म्हणजे 'वेळ-व्यवस्थापन' ! पण ही समजूत आपल्या दृष्टीने फार चुकीची आहे कारण एक मजूर सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत जेवणाचा एक तास वगळता पूर्ण ८ तास आपल्या कामात 'व्यस्त' राहतो, 'कठीण परिश्रम' करतो आणि सायंकाळी त्याचे ठरलेले पारिश्रमिक मिळवतो. ठरलेले पारिश्रमिक मिळविणे, वर एक-दोन तास अधिक मजूरी करून 'ओव्हर टाईम'च्या रूपांत अधिक पैसे मिळविणे हे एका मजुराच्या दृष्टीने पाहिले तर 'यश-संपादन'च आहे कारण त्याने हवे ते परिश्रमपूर्वक मिळविले. हवे ते मिळविण्यासाठी त्या मजुराने काबाड कष्ट केले, आपले दैनिक क्रियाकलाप आटपून वेळेवारी कामावर पोचला हे त्याच्या दृष्टीने उत्तम 'वेळ-व्यवस्थापन' देखील झाले. पण आपल्या दृष्टीने असे काबाड कष्ट करून केवळ आपले 'पारिश्रमिक' आणि 'ओव्हर टाईम' मिळविणे याला 'यश' आणि ते मिळविण्यासाठी साधलेला 'वेळ' याला 'वेळ-व्यवस्थापन' म्हणता येईल कां ? नाही नं ? कारण आपली 'यशाची' आणि 'वेळ-व्यवस्थापनाची' संकल्पना फार वेगळी आहे.
आजच्या आधुनिक भाषेत म्हंटले तर 'हार्ड वर्क' आणि 'स्मार्ट वर्क' या दोन कार्य-पद्धती मधील अंतर जर आपल्या लक्षात आला आणि या दोन्ही कार्य-पद्धतींचा योग्य प्रमाणात आपण आधार घेतला, उपयोग केला तरच आपल्याला अचूक 'वेळ-व्यवस्थापन' करणे आणि त्याद्वारे वांछित 'यश-संपादन' करणे शक्य होते.
यश-संपादनासाठी आवश्यक 'वेळ-व्यवस्थापन' करण्यात आपल्या संस्कृतीने बाळकडूच्या रूपांत दिलेल्या काही शिकवणी आपल्या मनावर एवढ्या 'खोल' पर्यंत कोरल्या जातात की आपल्या यश-संपादन आणि वेळ-व्यवस्थापन दोन्हींसाठी 'बाधक' ठरतात ! या शिकवणी पैकी दोन सर्वाधिक बाधक शिकवणी आहेत - १) आराम हराम आहे ! आणि २) रिकामे डोके सैतानाचे घर असते !

उद्या याच दोन शिकवणी बद्दल आपल्या काय चुकीच्या समजूती आहेत यावर चिंतन करूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Interesting....
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteआपणांस Whats App द्वारे आपल्या भ्रमणध्वनी वर या विषयावरील पोस्ट्सचे alerts हवे असल्यास माझ्या Whats App भ्रमणध्वनी क्रमांक +91 98260 24137 वर संदेश करावा.
पुनश्च अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि आभार !
डॉ.अश्विन भागवत, उज्जैन
Thanks for feedback.
ReplyDeleteNice tips
ReplyDelete