।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
आपण वेळ व्यवस्थापन वर चिंतन करीत आहोत. काल आपण बघितले की आपल्याला बाळकडूच्या रूपांत मिळालेल्या काही शिकवणी बद्दल आपल्या फार चुकीच्या समजुती आहेत. 'आराम' हा 'हराम' नसून मर्यादित प्रमाणात, योग्य दिशा ठरविण्यासाठी केला असता 'वरदान' सिद्ध होतो आणि 'रिकामे डोके' हे 'सैतानाचे घर' नव्हे तर 'नवीन कल्पनांचे' , 'नवीन विचारांचे', 'नवीन योजनांचे' उद्गम स्थळ ठरते !
आज आपण "वेळेची-किंमत" या विषयावर चिंतन करूया.
लहानपणापासून आपल्याला आई-वडिलांकडून, गुरुजनांनकडून 'वेळेची किंमत करावी' अशी सूचना असंख्य वेळा मिळालेली आहे पण 'वेळ फार मौल्यवान आहे', 'गेलेला वेळ परत येत नाही' वेळेची केवळ एवढीच किंमत आपल्या मनांत रुजलेली आहे. वेळ-व्यवस्थापनासाठी आपल्याला आपल्या वेळेची 'खरी किंमत' कळणे फार गरजेचे आहे. वेळेची खरी किंमत कळल्याखेरीज आपल्याला वेळेचे योग्य नियोजन करणे फार अवघड आहे. जो पर्यंत वेळेची किंमत आपल्याला आपल्या 'मिळकत' आपले 'उत्पन्न' या रूपांत नाही कळणार, तोपर्यंत आपण यावर 'गंभीरपणे' विचार करण्यास प्रवृत्त नाही होणार.
वेळेची खरी किंमत एका उदाहरणाच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न करूया.
आपण गृहीत धरूया की आपला मासिक पगार रु.३०,०००/- आहे आणि यासाठी आपल्याला महिन्यातून २५ दिवस ८ तास काम करणे गरजेचे आहे. आपण रोज ८ तास कामावर असतो पण कार्यालयातील मित्रांशी गप्पा, अंतर्जालावरील भ्रमंती, मित्र किंवा नातेवाईकांशी दूरध्वनिक चर्चेचा वेळ वगळला तर रोज केवळ ६ तास 'खरे काम' करीत असतो. म्हणजे आपण महिन्यात ६ X २५ = १५० तास काम करून रु.३०,०००/- मिळवतो , आता ३०००० / १५० = २००/- म्हणजे आपल्या एका तासाची किंमत रु.२००/- आहे आणि आपण जर एका दिवसातून
२ तास जरी फुकट घालविले तरी २ X २०० X ३६५ = १,४६,०००/- ,आपण वर्षभरांत आपल्या स्वत: चे रु.१,४६,०००/- चे नुकसान करून घेतो. या उलट आपण २ तास रोज सार्थकी लावले तर आपण वर्षभरांत एवढीच रक्कम अधिक मिळवू शकतो.
एका फार महत्वाच्या उदाहरणाने, एक छोटासा प्रयोग करून पाहूया.
आपण महिन्यातून २५ दिवस काम करतो असे गृहीत धरले आहे म्हणजे आपण ५ दिवस महिन्यातून रजेचे मोजले आहे. रजेच्या दिवशी आपण मुळीच काम करीत नाही, आपला संपूर्ण दिवस फुकट घालवतो. आपण जर रजेच्या ५ दिवसापैकी ४ दिवस ४ तास काम केले तर ४ X ४ X २०० = रु.३,२००/- X १२ महिने = रु.३८,४००/- ची अधिक मिळकत आपण एका वर्षात करून घेणे शक्य आहे.
रजेच्या दिवशीच्या याच ४ तासांची गुंतवण (Investment) जर आपण आत्मावालोकन, आपल्या कार्याचे विश्लेषण करून 'आणखी उत्पन्न मिळविण्यासाठी काय करावे' या चिंतनांत, अभ्यासात, आपले संबंध वाढविण्यात केली, , स्वत;ला आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे परिवर्तीत करून घ्यायची सुरुवात केली तर हे उत्पन्न किती तरी पटीने वाढणे संभव आहे. आत्मावालोकन, चिंतन , विश्लेषण, संबंध वाढविणे इतर या सर्व उपकरणांचा वापर करूनच लहानपणी पेपर वाटणारा व्यक्ती केवळ एक वैज्ञानिकच नव्हे तर देशाचा "राष्ट्रपती' होतो आणि 'चहा' ची टपरी चालविणारा व्यक्ती केवळ एका राज्याचा मुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचा पंतप्रधान" होतो. हे दोनही उदाहरण परदेशातील नसून आपल्या भारतातलेच आहे आणि अनुकरणीय आहे.
आपल्याला रिकाम्या वेळेत अश्या महान विभूतींचे चरित्र, यशोगाथा वाचायला हवी, ऐकायला हवी. महान विभूतींच्या चरित्रातून आपल्याला बरेच दिशा निर्देश, कल्पना तर मिळतातच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देखील मिळते. अपयशाने खचून न जाता त्याला सकारात्मक दृष्ट्या स्वीकार करून मिळालेल्या अपयशातून या थोर विभूतींनी पुढच्या योजनेच्या आखणीसाठी कसा बोध घेतला हे कळल्यावर आपली विचारसरणी देखील सकारात्मक होऊ लागते. अपयशामुळे सर्व काही गमावून नव्याने शून्यापासून मोठे साम्राज्य पुन्हा उभे करणे कसे शक्य होते हे थोर विभूतींच्या चरित्रातूनच कळते आणि नुसते कळत नाही तर हळू-हळू पटू देखील लागते, स्वत;वरचा गमावलेला आत्मविश्वास हळू-हळू पुन्हा निर्माण होऊ लागतो आणि यशाच्या मंदिराच्या पायऱ्या दृष्टीस पडू लागतात. एकदा यशाच्या पायऱ्या दिसू लागल्या की शिखर गाठणे काही अवघड नाही.
आपले माजी राष्ट्रपती 'कलाम' साहेबांची आत्मकथा सुप्रसिध्द शायर आणि गीतकार 'गुलझार' साहेबांच्या आवाजात आपल्यासाठी येथे उपलब्ध करून देत आहे , ती ऐकण्यासाठी त्यांच्या खालील चित्रावर क्लिक करावे,

apratim
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDelete