।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
सर्वप्रथम आपणां सर्वांना 'स्वातंत्र्य-दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा !
काल आपण बघितले की आपल्या अनियमितपणा आणि अव्यवस्थितपणामुळे आपण कुठलेही कार्य करण्यात 'दिरंगाई' किंवा 'चालढकल' करीत असतो. आपल्या अनियमितपणा आणि अव्यवस्थितपणा साठी कारणीभूत असतो आपल्या डोक्यात राहणारा 'झटपट आनंद देणारा माकड' जो कुठलेही काम पूर्ण न करू देता आपले चित्त दुसरीकडे वेधतो आणि त्याच्या प्रभावामुळे आपण आपली कामे अर्धवट सोडून त्याच्या बरोबर सैराट पळतो.
या 'झटपट आनंद देणाऱ्या माकडा'च्या नादी लागल्याचे फार गंभीर आणि दुष्परिणाम समोर येतात. आपल्या जवळ अपूर्ण /अर्धवट कामांचा ढीग जमा होतो ज्यामुळे आपण पार भांबावून जातो. कामे अपूर्ण राहिल्यामुळे आपला मनस्ताप वाढत जातो, काही करण्याची ईच्छा होत नाही, कामाच्या काळजी आणि चिन्तेमुळे मन अधिक व्यग्र होते, अर्धवट कामामुळे होणाऱ्या परिणामाचे भय वाटू लागते, अपराध-बोध वाढू लागतो आणि आपला आत्मविश्वास हळू-हळू कमी होत जातो.
चालढकल करण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वत:साठी एक योग्य आणि अनुकूल दिनचर्या आखून त्याचे अनुसरण सुरु केले पाहिजे. दिनचर्येप्रमाणे जी कामे आपण केली त्यासाठी स्वत:ला शाबासकी दिली पाहिजे, पुरस्कृत केले पाहिजे जेणेकरून स्व-प्रवृत्त होऊन दिनचर्येचे पूर्णपणे अनुसरण संभव होईल आणि आपल्या स्वभावात नियमितता हळू-हळू 'मुरु' लागेल. आपली दिनचर्या नियमित झाली की आपल्याला प्रत्येक श्रेणीच्या कामांसाठी निश्चित वेळ मिळत जाईल. आपली 'आवड' आणि 'गरज' या दोन गोष्टींच्या आधारवर आपण जर आपल्या कामांची प्राथमिकता ठरवली आणि त्यांची विभागणी प्रथामिकतेच्या आधारावर एका वरीयता सूचीत केली तर कामे करणे आणखी सोपे आणि आनंददायक होईल. पण कामे आटोपल्यावर स्वत:ला 'शाबासकी' देऊन पुरस्कृत करणे विसरू नये. तसेच आपल्या मेंदूला देखील सकारात्मक विचारांचे खाद्य नियमितपणे पुरवायला हवे आणि यासाठी आपल्याला चांगल्या पुस्तकांचे वाचन मुख्यत्वे यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचायला हवे. आपल्या मेंदूला टीव्ही च्या मालिकांपासून दूर ठेवावे, मालिकांमध्ये आपण गुंतत जातो, आपला वेळ तर वाया जातोच, आपले विचार देखील दुषित होतात.
चालढकल करण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी वरील उपायांशिवाय स्वत:ला खालील प्रश्न विचारून त्यांचे उत्तर शोधायला हवे-
या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतांना आपल्याला हे ध्यानात येईल की आपण आपल्या मानसिक व शारीरिक ऊर्जेचा आणि आपल्या वेळाचा 'व्यय' करीत आहोत,अपव्यय करीत आहोत की 'निवेश' करीत आहोत. या तिन्हींच्या 'निवेशा' ला सर्वाधिक प्राथमिकता द्यायला हवी.
उत्तरे देतांना हे ध्यानांत ठेवावे की योग्य आणि अयोग्य ही दोन शब्दे 'व्यक्ती-सापेक्ष' आहे अर्थात एका व्यक्तीला योग्य वाटणारे दुसऱ्या व्यक्तीला अयोग्य वाटू शकते तसेच एका व्यक्तीला अयोग्य वाटणारे दुसऱ्याला योग्य वाटू शकते पण म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करणे, तिला योग्य ठरवणे योग्य नव्हे. ईतरांचा विचार करून आपल्याला योग्य-अयोग्य ठरविता आले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये योग्य-अयोग्याची निर्णय क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. ही निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी आपल्या दिनाचार्येतील अधिकाधिक वेळ 'चिंतन', 'मंथन' आणि 'पुढील योजनेच्या आखणीसाठी' द्यायला हवा.
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी म्हंटले आहे "मला जर एक झाड कापण्यासाठी ६ तासांचा वेळ दिला, तर त्यातील पहिले ४ तास मी कुऱ्हाडाला धार करण्यास देईन". हा विचार वेळ-व्यवस्थापनाचा महामंत्र आहे आणि सर्व थोर व्यक्तींच्या आचरणातून या महामंत्राचा जयघोष स्पष्ट ऐकू येतो.
म्हणून दिवसातील अधिकांश क्षणांचा आपण चिंतन, मंथन आणि योजनेच्या आखणी मध्ये 'निवेश' केला तर वेळ-व्यवस्थापन करणेच नव्हे तर त्याद्वारे यश-संपादन करणे देखील अतिशय सोपे जाईल.

१. आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक उर्जेचा योग्य उपयोग करून घेत आहोत कां ?
२. आपल्या वेळाचा जो उपयोग आपण करीत आहोत तो 'योग्य' आहे कां ?
३. आपल्या दिनचर्येत 'आराम' चे प्रमाण योग्य आहे की नाही ?
४. आपण आपला अधिकांश वेळाची 'गुंतवणूक' करीत आहोत की केवळ 'खर्च' करीत आहोत ?
५. आपल्या दिनचर्येत आपली 'आवड' आणि आपली 'गरज' याचे प्रमाण संतुलित आहे कां?
६. आपण आपल्या दिनचर्येत 'चिंतन', 'मंथन' आणि पुढील 'योजना-आखणी' साठी वेळ दिलेला आहे की नाही ?
या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतांना आपल्याला हे ध्यानात येईल की आपण आपल्या मानसिक व शारीरिक ऊर्जेचा आणि आपल्या वेळाचा 'व्यय' करीत आहोत,अपव्यय करीत आहोत की 'निवेश' करीत आहोत. या तिन्हींच्या 'निवेशा' ला सर्वाधिक प्राथमिकता द्यायला हवी.
उत्तरे देतांना हे ध्यानांत ठेवावे की योग्य आणि अयोग्य ही दोन शब्दे 'व्यक्ती-सापेक्ष' आहे अर्थात एका व्यक्तीला योग्य वाटणारे दुसऱ्या व्यक्तीला अयोग्य वाटू शकते तसेच एका व्यक्तीला अयोग्य वाटणारे दुसऱ्याला योग्य वाटू शकते पण म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करणे, तिला योग्य ठरवणे योग्य नव्हे. ईतरांचा विचार करून आपल्याला योग्य-अयोग्य ठरविता आले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये योग्य-अयोग्याची निर्णय क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. ही निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी आपल्या दिनाचार्येतील अधिकाधिक वेळ 'चिंतन', 'मंथन' आणि 'पुढील योजनेच्या आखणीसाठी' द्यायला हवा.
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी म्हंटले आहे "मला जर एक झाड कापण्यासाठी ६ तासांचा वेळ दिला, तर त्यातील पहिले ४ तास मी कुऱ्हाडाला धार करण्यास देईन". हा विचार वेळ-व्यवस्थापनाचा महामंत्र आहे आणि सर्व थोर व्यक्तींच्या आचरणातून या महामंत्राचा जयघोष स्पष्ट ऐकू येतो.
म्हणून दिवसातील अधिकांश क्षणांचा आपण चिंतन, मंथन आणि योजनेच्या आखणी मध्ये 'निवेश' केला तर वेळ-व्यवस्थापन करणेच नव्हे तर त्याद्वारे यश-संपादन करणे देखील अतिशय सोपे जाईल.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
No comments:
Post a Comment