।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामे करतात जी सहा महत्वाच्या निकषांवर (Criteria) आधारित असतात, ज्यापैकी सुसंगतपणा आणि संतुलन या दोन निकषांवर आपण काल चिंतन केले. आपण पाहिले की आपल्या जीवनाचे ध्येय आणि आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी यात सुसंगतपणा असणे फार गरजेचे आहे तसेच जीवन जगताना आपण आपल्या प्रत्येक भूमिकेचे निर्वहन योग्यपणे केले पाहिजे. एका स्त्रीचा नवरा म्हणून वावरताना आपल्याला मुलगा,भाऊ, वडील, काका,मामा, दीर, मित्र या सर्व भूमिकांबरोबर देखील न्याय केलाच पाहिजे, सर्व भूमिकांमध्ये संतुलन राखल्याने मन:स्ताप कमी होतात, संबंध वाढीस लागतात आणि आपल्याला गरज पडल्यावर बरेच हात मदतीला पुढे येतात. आपले यश-संपादन हे केवळ आपल्या कर्तृत्वावर अवलंबून नसून असंख्य लोकांच्या सहाय्यावर, सद्भावनांवर अवलंबून असते. पुढील निकष आहेत -
यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामे करतात जी सहा महत्वाच्या निकषांवर (Criteria) आधारित असतात, ज्यापैकी सुसंगतपणा आणि संतुलन या दोन निकषांवर आपण काल चिंतन केले. आपण पाहिले की आपल्या जीवनाचे ध्येय आणि आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी यात सुसंगतपणा असणे फार गरजेचे आहे तसेच जीवन जगताना आपण आपल्या प्रत्येक भूमिकेचे निर्वहन योग्यपणे केले पाहिजे. एका स्त्रीचा नवरा म्हणून वावरताना आपल्याला मुलगा,भाऊ, वडील, काका,मामा, दीर, मित्र या सर्व भूमिकांबरोबर देखील न्याय केलाच पाहिजे, सर्व भूमिकांमध्ये संतुलन राखल्याने मन:स्ताप कमी होतात, संबंध वाढीस लागतात आणि आपल्याला गरज पडल्यावर बरेच हात मदतीला पुढे येतात. आपले यश-संपादन हे केवळ आपल्या कर्तृत्वावर अवलंबून नसून असंख्य लोकांच्या सहाय्यावर, सद्भावनांवर अवलंबून असते. पुढील निकष आहेत -
- लक्ष्य केंद्रितता - लक्ष्याभिमुख (Goal Oriented ) होण्यासाठी आपल्या नजरेस आपले लक्ष्य सुस्पष्ट दिसणे अतिशय गरजेचे आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे संपूर्ण मासोळी किंवा आजू-बाजूचे दृश्य न दिसून केवळ मासोळीचा 'डोळा' दिसत होता, त्याच प्रमाणे आपल्यालाही केवळ आपले लक्ष्य सुस्पष्ट दिसणे अतिशय गरजेचे आहे. लक्ष्य केंद्रितता मिळविण्यासाठी आपल्याला अश्या साधनाची गरज असते जे आपल्याला अधिकाधिक वेळ चौकोन २ च्या कामांमध्ये द्यायसाठी प्रेरित करतील, मदत करतील जेणेकरून आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरविण्यास, आणि-बाणीच्या कामांना निस्तरण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपला वेळ प्रतिबंधात्मक कृती (Preventive Action ) करण्यास मदत होईल. यासाठी सर्वाधिक उपयुक्त साधन "साप्ताहिक नियोजन" करणे आहे. दैनंदिन प्राधान्यक्रम ठरविणे म्हणजे साप्ताहिक नियोजनाची केवळ पूर्व तयारी असते. एखादी 'डिश' बनवताना आपण त्यासाठी आवश्यक सामग्री एकत्र करून त्या डिशची पूर्व-तयारी करतो आणि मग त्या डिशच्या पाककृती प्रमाणे ती तयार करतो तसेच सर्व कामांची यादी बनवून दैनंदिन प्राधान्यक्रम ठरविणे म्हणजे पूर्व तयारी आणि साप्ताहिक नियोजन म्हणजे पाककृती प्रमाणे डिश तयार करणे होय.
दैनंदिन नियोजनापेक्षा साप्ताहिक नियोजनाद्वारे आपल्या कार्यांमध्ये आणि भूमिकांमध्ये योग्य समतोल राखणे शक्य होते आणि उत्तम अपेक्षित परिणाम मिळतात. आपण आपल्या साप्ताहिक नियोजनामध्ये प्रत्येक भूमिकेशी संबंधित उद्दिष्ट ठरवून ते साध्य करू शकतो कारण साप्ताहिक नियोजनात एकाद्या कामाला स्थान मिळाले की ते विसरणे संभव नाही. उदाहरणार्थ आपला मामा ज्याने लहानपणी आपले खूब लाड पुरविले, कौतुक केले , तो फार आजारी आहे असे कळल्यावर आपले मन उद्विग्न (उदास) होते पण पुढील २-३ दिवस आपण फार व्यस्त असल्यामुळे आपल्याला पुढील २-३ दिवस त्याची तब्यत पाहायला जाणे शक्य नाही. पुढे २-३ दिवसांनी आपल्या उद्विग्नतेची तीव्रता कमी होते आणि आपण अन्य कामांना प्राथमिकता देऊन तब्यत पाहायला जाणे आणखी १-२ दिवस पुढे ढकलतो आणि असे करत आपण ते पार विसरून जातो आणि एक दिवस मामा वारल्याची दु:खद बातमी आपल्याला कळते आणि आपल्याकडे शिवाय पश्चात्तापाच्या आणखी काही नाही राहात. अश्यावेळेस आपण जर मामाला भेटायला जाण्याला आपल्या प्राधान्य क्रमात महत्वाचा क्रम देऊन आठवड्याच्या शेवटल्या दिवशी अर्थात रजेच्या दिवशीच्या कार्यांमध्ये प्राथमिक स्थान दिले असते तर ते सहज शक्य झाले असते. वेळ कधीही आणि कुणासाठीही थांबत नाही म्हणून आपल्या स्मृतीवर अवलंबून न राहता जर प्रत्येक कामाला आपल्या साप्ताहिक वेळा-पत्रकात स्थान दिला तर कुठलेही कार्य साध्य/पूर्ण नाही झाले तरी त्याची नोंद आपल्या वेळा-पत्रकांत असल्यामुळे आपण ते विसरत नाही आणि पुढील आठवड्याचे वेळा-पत्रक ठरविताना त्या अपूर्ण/न झालेल्या कामाची नोंद त्यात करतो आणि ते कार्य एक-दोन आठवडे जरी लांबले तरी ते पूर्ण होते. केवळ लक्ष्य ठरवून ते साध्य होत नाही त्यासाठी लक्ष्याभिमुख होऊन कृती करणे गरजेचे आहे. साप्ताहिक नियोजन केल्याने आवश्यक लक्ष्य-केंद्रितता मिळवून आपण लक्ष्याभिमुख होतो जेणेकरून यश-संपादन करणे सहज शक्य होते. - लोक-परिमाण : यशस्वी व्यक्ती लोक-व्यवहाराला वेळा-पत्रकाहून अधिक महत्व आणि प्राथमिकता देतात. यश-सम्पादनांत वेळेच्या बाबतीत कार्यक्षम (Efficient) असण्यापेक्षा लोकांशी व्यवहाराच्या बाबतीत कार्यक्षम असणे अधिक उपयोगी असते कारण चौकोन २ च्या कामांमध्ये तत्वांना प्राथमिकता आणि वेळ-पत्रकाला दुय्यमत्व मिळते. साप्ताहिक वेळा-पत्राची आखणी एक साधन आहे पण साध्य नाही. केवळ वेळा-पत्रकात नोंद असलेली कामे वेळे-वारी केल्याने जे साध्य होत नाही ते बऱ्याचदा वेळा-पत्रक एकीकडे ठेऊन त्यात नोंद नसलेले पण "तत्वाधिष्ठीत" काम प्राथामिकतेने केल्याने सहज साध्य होते. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामाने आज दोन दिवसासाठी परगावी जाण्याची आपल्या वेळा-पत्रकांत नोंद आहे आणि आपल्या मुलीने शाळेचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून एका स्प्रधेत 'कांस्य पदक' पटकाविले आहे आणि शाळेत उद्या तिचा कौतुक समारंभ आहे ज्यात पालक म्हणून उपस्थिती देणे आपल्या मुलीला अपेक्षित आहे. अश्या वेळेस आपण जर आपल्या वेळा-पत्रकाला प्राथमिकता देऊन परगावी गेलो आणि एखादा मोठा फायद्याचा अनुबंध जरी आपण केला तरी आपण अनुपस्थित राहून आपल्या मुलीच्या जीवनातील सोनेरी क्षणांना मुकलो. चौकोन २ च्या कामात धनार्जनापेक्षा, प्रसिद्धीपेक्षा 'तत्वांना' प्राथमिकता असते. तत्वांसाठी आपले वेळा-पत्रक गडबडले तरी अपराध-बोधाने ग्रस्त न होता तत्वांना, माणसांना प्राथमिकता देत आपले कार्य करीत राहिले पाहिजे.
- लवचिकता : आपल्या नियोजनाच्या साधनांवर यशस्वी लोकांचा 'ताबा' असतो. नियोजनांची साधने त्यांचे 'दास' बनून राहतात 'स्वामी' बनून नाही. नियोजनाची साधने ही आपले काम सोपे करण्यासाठी असतात म्हणून त्यात लवचिकता असणे अतिशय गरजेचे आहे. वेळा-पत्रक आखणी झाल्यावर जर ती आपल्या स्वभावाच्या अनुकूल नसली, गरजांच्या अनुकूल नसली, आपल्या कार्य-पद्धतीच्या अनुकूल नसली तर आपल्याला त्या वेळा-पत्रकाचे अनुसरण करणे फार जड जाईल व अनुसरण करण्यात मजा देखील येणार नाही आणि, हळू-हळू आपली साप्ताहिक नियोजनाची सवय मोडत जाईल. म्हणून आपली नियोजनाची साधने ही अगदी वैयक्तिक आणि लवचिक देखील असायला पाहिजे. वेळा-पत्रकांत एकदा झालेली नोंद ही "दगडाची रेष' होता कामा नये, आपल्याला वेळ-काळ-स्वभाव-परिस्थिती-अनुकुलता-कार्यपद्धती या सर्वाचा विचार करून जर त्यात फेरबदल अपेक्षित वाटला तर तो करण्यास सदैव तत्पर राहिले पाहिजे.
- सहजता : यशस्वी लोकांची नियोजनांची साधने अगदी सहज असतात. त्यांना ती आपल्या बरोबर बाळगणे अगदी सहज वाटते आणि फावल्या वेळात ते आपल्या नियोजनाच्या साधनांचा आढावा घेत असतात . उदाहरणार्थ आपले नियोजनाचे मुख्य साधन आपले वेळा-पत्रक हे नेहमी आपल्या बरोबर नेता आले पाहिजे. आपण आपले वेळा-पत्रक एका मोठ्या तख्त्यावर लिहून घरी ठेवले तर ते आपल्याला आपल्या बरोबर नेहमी बाळगणे अवघड जाते. म्हणून आपण काळा-बरोबर स्वत: मध्ये बदल करीत राहणे गरजेचे आहे. आपण आधुनिक साधनांचा पुरे-पूर वापर करणे शिकायला हवे. उदाहरणार्थ आपण जर आपले वेळा-पत्रक आपल्या भ्रमणध्वनि यंत्रामध्ये बनविले किंवा आपल्या वेळा-पत्रकाचा फोटो काढून आपल्या मोबाईल मध्ये ठेवले आणि प्रत्येक महत्वाच्या कामाचे रिमाइन्डर त्यात लावून ठेवले तर आपल्या एकही कामाची वेळ चुकणार नाही आणि आपण आपली सर्व कामे उत्तमरीत्या करणे आपल्याला सोपे वाटेल.
आज येथेच विरमतो आहे . उद्या आपण यशाच्या दिशेला पुढील पाऊल 'स्वयं-व्यवस्थापन' कडे उचलू कारण वेळ-व्यवस्थापनाचा पाया 'स्वयं-व्यवस्थापन' आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Uttam vivechan ani mandani.
ReplyDeleteDhanywad
Sandeep sunkale
Uttam vivechan ani mandani.
ReplyDeleteDhanywad
Sandeep sunkale
धन्यवाद !
ReplyDelete